नौदलाची शिलाई केलेली बोट सागरी प्रवासाला निघणार आहे.
पोरबंदर ते मस्कत मग बाली येथे जाण्याची योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाची अनोखी स्टिच्ड नौका (शिवलेले जहाज) आयएनएसव्ही कौंडिन्य स्वत:चा पहिला सागरी प्रवास सुरू करणार आहे. याचा पहिला सागरी प्रवास गुजरातच्या पोरबंदर येथून सुरू होईल आणि ही नौका ओमानच्या मस्कत येथे पोहोचणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या नौकेला फ्लॅगऑफ करणार आहेत. कौंडिन्यचा हा प्रवास ऐतिहासिक सागरी मार्गांना प्रतिकात्मक स्वरुपात अधोरेखित करणार आहे.
आयएनएसव्ही कौंडिन्य भारताच्या प्राचीन जहाजबांधणी आणि सागरी प्रवासाच्या परंपरांना पुन्हा जिवंत करते. ही यात्रा अशा जुन्या सागरी मार्गांची आठवण करून देणार आहे, ज्यांच्या माध्यमातून भारत हजारो वर्षांपर्यंत हिंदी महासागराच्या देशांशी जोडलेला राहिला. प्राचीन भारतीय जहाजांच्या चित्रांनी प्रेरित होत निर्मित या नौकेची निर्मिती पूर्णपणे पारंपरिक तंत्रज्ञानाने करण्यात आल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन विवेक मधवाल यांनी दिली आहे.
आयएनएसव्ही कौंडिन्य इतिहास आणि आधुनिक नौसैनिक कौशल्याचा अनोखा मेळ आहे. आधुनिक जहाजांच्या उटल याच्या लाकडी तख्तांना खिळ्यांनी नव्हे तर दोरखंडाने शिवण्यात आले तसेच नैसर्गिक गोंदाने जोडण्यात आले आहे. हेच तंत्रज्ञान कधीकाळी भारताचे किनारे आणि पूर्ण हिंदी महासागर क्षेत्रात प्रचलित होते. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय खलाशी आधुनिक दिशादर्शन आणि धातू तंत्रज्ञान उपलब्ध होण्यापूर्वी पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिणपूर्व आशियापर्यंत दीर्घ सागरी प्रवास करत होते.
प्रथम मस्कत, मग बाली
आयएनएसव्ही कौंडिन्यचा मस्कत प्रवास सुमारे दोन आठवड्यांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर ही नौका बालीला पोहोचणार आहे. ही नौका हजारो वर्षांपूर्वी व्यापाराचा पारंपरिक मार्ग राहिलेल्या मार्गाने प्रवास करणार आहे. ज्यानंतर आयएनएसव्ही कौंडिन्यला नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये ठेवले जाईल, जे गुजरातच्या लोथल येथे आहे. आयएनएसव्ही कौंडिन्यद्वारे जगाला भारताच्या मेरीटाइम हेरिटेजची ओळख करून दिली जातेय. भारतात जहाजबांधणीची कला शतकांपासून असल्याचा संदेशही देण्यात येत आहे.
Comments are closed.