दारूच्या नशेत इंग्लंड संघाचे खेळाडू, मध्यरात्रीचा कोणी न पाहिलेला Exclusive व्हिडीओ, क्रिकेट वि
बेन डकेट जेकब बेथेल मद्यधुंद व्हिडिओ व्हायरल : ॲशेस मालिकेत मैदानावर सातत्याने पराभव पत्करत असलेली इंग्लंडची टीम आता मैदानाबाहेरील वादांमुळेही अडचणीत सापडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 11 दिवसांत ॲशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लिश कॅम्पमध्ये आधीच निराशेचे वातावरण होते. त्यातच आता खेळाडूंशी संबंधित व्हायरल व्हिडीओमुळे संघ व्यवस्थापनाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने सलग तीनही कसोटी सामने गमावले आहेत. मात्र, आता संघातील दोन फलंदाज बेन डकेट आणि जेकब बेथेलशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमुळे खेळाडूंवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Jacob Bethell त्याच्या vape, Rob Key 🚭😂 चा आनंद घेत असल्याचे दिसते
ॲशेसमध्ये 2-0 ने पिछाडीवर गेल्यानंतर नूसामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांच्या 'स्टेग'चा आनंद घेताना पहा.# राख #RobKey #नूसा # मर्फी #झायरिचर्डसन #स्टीव्हस्मिथ #मार्नस #बाझबॉल #बेनस्टोक्स— चार्ली (@Shanks63331148) 23 डिसेंबर 2025
बेन डकेटचा व्हिडीओ व्हायरल (Ben Duckett investigated after appearing drunk in video)
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट नशेत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत तो आपल्या हॉटेलच्या खोलीकडे जाण्याचा रस्ताही विसरल्यासारखा भासत आहे. फुटेजमध्ये एक राहगीर त्याला गंमतीशीर स्वरात विचारतो की, “तुला ट्रेनिंग ग्राउंडवर परत जाण्यासाठी टॅक्सी हवी आहे का?” हा प्रकार पाहून ॲशेसदरम्यान मिळालेल्या ब्रेकमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचे सेवन केले. त्यामुळे शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डकेट अर्थव्यवस्थेला मोठी मदत करत आहे pic.twitter.com/FXyoMUyjIx
— लिव्हरवुड (@21_liverwood) 23 डिसेंबर 2025
नाइट क्लबमधील जेकब बेथेलचा व्हिडीओ
दुसरीकडे, युवा फलंदाज जेकब बेथेलही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये तो एका नाइट क्लबमध्ये एका अज्ञात व्यक्तीसोबत वेपिंग करताना आणि नाचताना दिसत आहे. मैदानाबाहेरील या घडामोडींमुळे ॲशेससारख्या महत्त्वाच्या आणि निर्णायक दौऱ्यात खेळाडूंची बांधिलकी आणि फोकस यावर शंका अधिक गडद झाल्या आहेत.
ECB कडून चौकशीचे संकेत
या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंड पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी याची पुष्टी करत सांगितले की, ॲशेसदरम्यान नूसा येथे मिळालेल्या ब्रेकच्या काळात अत्याधिक मद्यपान झाल्याच्या अहवालांचा आढावा घेतला जाईल. पण, त्यांनी हेही स्पष्ट केले की हा ब्रेक दीर्घ आणि थकवणाऱ्या दौऱ्याच्या दरम्यान खेळाडूंना विश्रांती मिळावी, यासाठी देण्यात आला होता. तसेच, खेळाडूंना मद्यपानावर बंदी नाही, मात्र अती प्रमाणात मद्यपान करणे धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.