वयाच्या 38 व्या वर्षी रोहित शर्माचे शानदार शतक! 2027 च्या वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी केली पक्की

38 वर्षांच्या रोहित शर्माने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये रोहितने झंझावाती शतकी खेळी करत मैदानावर खळबळ माजवून दिली. या शतकासह रोहितने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2027) आपला प्रबळ दावा ठोकला आहे.

या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटला टी20 चा तडाखा दिला आणि आपल्या वादळी शतकाने विरोधी संघाला चांगलेच हतबल केले. आता रोहितच्या या खेळीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहितने शानदार अर्धशतक झळकावले होते.

रोहित शर्माने अवघ्या 62 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंत 8 चौकार आणि 8 गगनभेदी षटकार ठोकले आहेत. आपल्या अष्टपैलू फलंदाजीने रोहितने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. रोहितने देखील आपल्या चाहत्यांना शानदार ‘शतकी भेट’ देऊन त्यांना खुश केले आहे.

Comments are closed.