Vijay Hazare Trophy- किंग कोहली अन् हिटमॅनची दादा’गिरी’; दोघांनीही शतके ठोकून धुरळा उडवला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धुरळा उडवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मातब्बर गोलंदाजांना चोपून काढनाऱ्या या ‘धुरंधर’ खेळाडूंची बऱ्याच दिवसांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दादा’गिरी’ पाहायला मिळाली. रोहित शर्मा मुंबईकडून आणि विराट कोहली दिल्लीकडून मैदानात उतरले आणि दोघांनीही खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये धावांची लयलूट केली.
मुंबईविरुद्ध सिक्कीम या सामन्यात रोहित शर्माची तळपती फलंदाजी उपस्थित चाहत्यांना पाहायला मिळाली. रोहितने 62 चेंडूंमध्ये चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतलं 37 व शतक साजर केलं. शतक साजर केल्यानंतर रोहितने गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. त्याने 94 चेंडूंचा सामना केला आणि 155 धावा चोपून काढल्या. रोहितने आपल्या डावात एकूण 9 षटकार आणि 19 चौकारांची आतषबाजी केली. रोहितच्या वादळी खेळीमुळे मुंबईने सिक्कीमचा 8 विकेटने पराभव केला.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
दुसरीकडे विराट कोहलीनेही आपले हात मोकळे केले आणि गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. तब्बल 15 वर्षांनी विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने आंध्रप्रदेशिवरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात 83 चेंडूंमध्ये शतक ठोकलं आहे. विराटने कोहलीने 101 चेंडूचा सामना केला आणि 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. विराटच्या शतकीय खेळीमुळे दिल्लीने आंध्रप्रदेशचा चार विकेटने पराभव केला.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
Comments are closed.