रेप केसमध्ये वेगवान गोलंदाजाचा जामीन अर्ज फेटाळला, आरसीबीच्या संघात चिंतेचं वातावरण
आयपीएल 2026 (Indian premiere league 2026) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार गोलंदाज यश दयालवर (Yash Dayal) एका अल्पवयीन मुलीवर रेप केल्याचा कथित आरोप आहे. या प्रकरणात जयपूरमधील POCSO न्यायालयाने त्याला मोठा धक्का देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
जयपूर महानगर न्यायालयाच्या (POCSO कोर्ट-3) न्यायाधीश अलका बन्सल यांनी दिलेल्या आदेशानुसार, उपलब्ध पुराव्यांवरून यश दयालला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे.
यश दयालने 2025 च्या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या, तर 2024 मध्ये 14 सामन्यांत 15 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच्या याच कामगिरीमुळे आरसीबीने त्याला 5 कोटी रुपयांमध्ये रिटेन (राखून ठेवणे) केले आहे. मात्र, आता या कायदेशीर संकटामुळे आरसीबीच्या चिंतेत भर पडली आहे.
यश दयालच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, यश आणि त्या मुलीची भेट फक्त सार्वजनिक ठिकाणी झाली होती, ते कधीही एकांतात भेटले नाहीत. मुलीने स्वतःला सज्ञान असल्याचे सांगून आणि आर्थिक अडचणीचे कारण देऊन यशकडून पैसे घेतले होते आणि ती वारंवार अधिक पैशांची मागणी करत होती.
IPL 2026 साठी RCB चा पूर्ण संघ:
रजत पाटीदार (कर्ंधर), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक सलामी, अभिषेक शर्मा. यादव, जेकब डफी, जॉर्डन कॉक्स, सात्विक देसवाल, विकी ओस्तवाल, कनिष्क चौहान आणि विहान मल्होत्रा.
Comments are closed.