रो-को ची वादळी खेळी, वैभवचा धमाका, स्वस्तिकचे द्विशतक! जाणून घ्या पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी

बुधवारी विजय हजारे ट्रॉफीचे सुरुवातीचे सामने पार पडले. संपूर्ण देशभरात एलीट ग्रुप आणि प्लेट ग्रुप मिळून एकूण 19 सामने खेळले गेले. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे चाहत्यांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या होत्या. सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्या ‘हिटमॅन’ शैलीत शतकी खेळी करत, गुलाबी शहरात (जयपूर) क्रिकेट प्रेमींना नाताळच्या पूर्वसंध्येला एक शानदार भेट दिली. दुसरीकडे, विराट कोहलीनेही चाहत्यांना निराश न करता शतक ठोकून दिल्लीला विजय मिळवून दिला. रोहितने आपल्या कारकिर्दीतील 37 वे ‘लिस्ट ए’ शतक झळकावताना 93 चेंडूत 155 धावा केल्या. तर कोहलीने आपल्या ‘लिस्ट ए’ कारकिर्दीतील 57 वे शतक झळकावले आणि या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 16000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

दरम्यान, इतर सामन्यांमध्ये बिहारकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 190 धावांची धडाकेबाज खेळी करत बिहारला 574 धावांचा विक्रमी धावसंख्या गाठून दिली. बुधवारी वैभवचे द्विशतक थोडक्यात हुकले. मात्र, ओडिशाच्या स्वास्तिक सामलने द्विशतक झळकावले, तरीही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही

Comments are closed.