14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका! 62 वर्षांचा जुना जागतिक विक्रम मोडत रचला इतिहास

काही दिवसांपूर्वी अंडर-19 आशिया चषकातील अपयशामुळे टीकेचा धनी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने चोख उत्तर दिले आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना केवळ 84 चेंडूत 190 धावांची तुफानी खेळी केली.

वैभवने केवळ 54 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा (Ab devilliers) 64 चेंडूंचा जागतिक विक्रम मोडला, जो गेल्या 62 वर्षांपासून कोणालाही मोडता आला नव्हता.

वैभवने केवळ 35 चेंडूत आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. त्याने आपल्या 190 धावांच्या खेळीत 15 षटकार आणि 16 चौकार मारले. विशेष म्हणजे, 190 पैकी 154 धावा त्याने केवळ बाउंड्रीजमधून (चौकार-षटकार) वसूल केल्या, जो लिस्ट-ए क्रिकेटमधील एक नवा विक्रम आहे.

एकाच डावात 15 षटकार मारून तो लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. पहिला क्रमांक 16 षटकारांसह श्रीलंकेच्या अलासंकाकडे आहे.

वैभवने हा पराक्रम अवघ्या 14 वर्षे 272 दिवस या वयात केला आहे. लिस्ट ‘ए’ क्रिकेट ही क्रिकेटमधील एक अधिकृत श्रेणी आहे. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यांचा समावेश होतो. यात साधारणपणे 40 ते 60 षटकांचे (बहुतेकदा 50 षटके) सामने खेळवले जातात. प्रथम श्रेणी (First Class) आणि ट्वेन्टी-20 प्रमाणेच, लिस्ट ‘ए’ ला आयसीसीने (ICC) मान्यता दिली आहे. नोव्हेंबर 2021 पासून महिला क्रिकेटलाही अधिकृतपणे लिस्ट ‘ए’चा दर्जा देण्यात आला आहे.

Comments are closed.