कर्नाटकने इतिहास पालटला! ईशान किशनच्या संघाविरुद्ध नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या पहिल्याच दिवशी (24 डिसेंबर) क्रिकेट चाहत्यांना धावांचा पाऊस पाहायला मिळाला. झारखंड आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 815 धावा केल्या. कर्नाटकने झारखंडचे 412 धावांचे विशाल लक्ष्य यशस्वीपणे पार करून विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘रन चेस’ (धावांचा यशस्वी पाठलाग) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
प्रथम फलंदाजी करताना झारखंडने 50 षटकांत 412 धावांचा डोंगर उभा केला. ईशान किशनने (Ishaan kishan) केवळ 33 चेंडूत शतक पूर्ण करत त्याने 39 चेंडूत 125 धावांची स्फोटक खेळी केली. यात 7 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश होता. तसेच विराट सिंगने 88 धावा केल्या तर कुमार कुशाग्र 63, शिखर मोहनने 44 धावा केल्या.
413 धावांचे अशक्य वाटणारे लक्ष्य कर्नाटकने अवघ्या 47.3 षटकांत 5 गडी राखून पूर्ण केले. देवदत्त पडिक्कलने 118 चेंडूत 147 धावांची मॅचविनिंग खेळी केली ज्यात 10 चौकार, 7 षटकार समाविष्ट होते. याचबरोबर मयंक अग्रवालने 34 चेंडूत 54 धावा केल्या. अभिनव मनोहरने 32 चेंडूत वेगवान 56 धावा तर ध्रुव प्रभाकरने 22 चेंडूत 40 धावा केल्या.
कर्नाटक संघाकडून अभिलाश शेट्टीने 72 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी घेतले. श्रेयस गोपाल आणि विद्याधर पाटिल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच झारखंड संघाने सौरभ शेखर आणि उत्कर्ष सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Comments are closed.