भारताचे 5 नवे हिरे! वैभव सूर्यवंशीसह या युवा खेळाडूंनी आपल्या खेळाने जगभरात केला दबदबा निर्माण
भारतात क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. टीम इंडियापर्यंत पोहोचणे तर सोडाच, पण स्वतःच्या राज्याच्या संघात स्थान मिळवण्यासाठीही खेळाडूंना खूप मेहनत करावी लागते. 2025 या वर्षात भारतीय क्रिकेटला असे 5 युवा हिरे मिळाले आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केले.
वैभव सूर्यवंशी
आयपीएल 2025 मध्ये वैभवने (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने एका सामन्यात 95 चेंडूत 171 धावांची वादळी खेळीही केली होती.
आयुष महात्रे
आयुष म्हात्रेने (Aayush Mhatre) अंडर-19 आशिया चषक 2025 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. आयपीएलमध्ये ‘सीएसके’ (CSK) कडून सलामीवीर म्हणून खेळताना त्याने आपल्या फलंदाजीची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली.
दीपेश देवेंद्रन
अंडर-19 आशिया चषकात दीपेशने (Deepesh devendran) भारतासाठी सर्वाधिक 14 विकेट्स (Wickets) घेतल्या. मलेशियाविरुद्ध त्याने 22 धावांत 5 गडी बाद करून खळबळ माजवली होती. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे त्याला भारताचा भविष्यातील स्टार मानले जात आहे.
अभिज्ञान कुंडू
अभिज्ञानने (Abhidyaan kundu) अंडर-19 आशिया चषकात मलेशियाविरुद्ध नाबाद 209 धावांचे ऐतिहासिक द्विशतक झळकावले. अंडर-19 स्तरावर द्विशतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
बिहान मल्होत्रा
अंडर-19 आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध जिद्दीने खेळत विहानने (Vihaan malhotra) भारताला फायनलमध्ये पोहोचवले. त्याच्यातील अष्टपैलू (All-rounder) क्षमता पाहून ‘आरसीबी’ने (RCB) त्याला आयपीएल 2026 च्या लिलावात आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
Comments are closed.