मोठा खुलासा! शुबमन गिलला टी-20 वर्ल्ड कप संघातून का वगळले? विशेष बैठकीतील धक्कादायक माहिती समोर

शुबमन गिलला (Shubman gill) टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघात स्थान न मिळाल्याने सर्वच चाहते थक्क झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो उपकर्णधार होता, तरीही त्याला संघातून डच्चू देण्यात आला. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, एका विशेष चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या धर्मशाला येथील सामन्यानंतर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया (Bcci Devjit Sakiya) यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत खेळाडूंच्या कामगिरीवर सविस्तर चर्चा झाली. वर्ल्ड कपचा संघ निवडण्यापूर्वी सचिवांनी मुख्य निवडकर्त्यांकडून (Chief Selector) सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा अहवाल मागवला होता. ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांत गिलला केवळ 32 धावा (क्रमशः 4, 0 आणि 28 धावा) करता आल्या. या खराब सरासरीमुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. जेव्हा गिल टी-20 संघात नव्हता, तेव्हा संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सलामीला (Open) येत होते. गिलच्या पुनरागमनामुळे संजूला खालच्या क्रमांकावर खेळावे लागले. संघ संतुलित ठेवण्यासाठी गिलची गरज आहे का, असा विचार या बैठकीत झाला.

बैठकीत यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal) आणि संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंच्या नावावर चर्चा झाली. शेवटी, गिलच्या तुलनेत इतर खेळाडूंचा टी-20 रेकॉर्ड चांगला असल्याने गिलला संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शुबमन गिल चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, रिपोर्टनुसार त्याला दुखापतीमुळे नाही, तर त्याच्या खराब फॉर्ममुळे वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आले आहे. 20 डिसेंबरला जेव्हा वर्ल्ड कपचा संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात गिलचे नाव नव्हते.

शुबमन गिलने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 754 धावा केल्या होत्या, त्यामुळेच वनडेचे कर्णधारपद आणि टी-20 चे उपकर्णधारपद मिळाले होते. पण वर्षाचा शेवट त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. विशेष म्हणजे, 2024 च्या टी-२20 वर्ल्ड कपमध्येही (ज्यात भारत चॅम्पियन बनला) गिलला संघात स्थान मिळाले नव्हते.

Comments are closed.