गुजरात जायंट्सचा संघ भक्कम, पण भारतीय फलंदाजीवर विश्वास नाही! आकाश चोप्रांनी व्यक्त केली चिंता
भारतीय संघाचे माजी फलंदाज आकाश चोप्रा (Aakash chopra) यांच्या मते, विमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 साठी गुजरात जायंट्सने एक तगडा संघ तयार केला आहे. मात्र, या संघात अनुभवी भारतीय फलंदाजांची कमतरता असल्याचे त्यांना वाटते. गुजरातने लिलावात न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनला 2 कोटी रुपयांत खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
संघात जॉर्जिया वेअरहॅम किंवा किम गार्थ यांपैकी एकालाच संधी मिळू शकते. गुजरातला आपली फलंदाजी मजबूत करण्याची गरज आहे, ज्यामुळे संघ निवडणे कठीण होईल. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स किंवा आरसीबी सारख्या संघांकडे पहिल्या 5 क्रमांकावर किमान 1-2 अनुभवी भारतीय खेळाडू आहेत. गुजरातकडे तशी ‘भरवशाची’ भारतीय फळी दिसत नाही.
यास्तिका भाटिया (Yastika bhatia) दुखापतीतून परतली आहे, पण ती ऋचा घोषसारखी (Richa Ghosh) आक्रमक नाही. त्यानंतर भारती फुलमाली येते. अशा परिस्थितीत जर वेअरहॅम खेळली नाही, तर गुजरातची फलंदाजी गडबडू शकते.
गुजरात जायंट्सचे आगामी सामने (WPL 2026):
10 जानेवारी: विरुद्ध युपी वॉरियर्स (पहिला सामना)
11 जानेवारी: विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
13 जानेवारी: विरुद्ध मुंबई इंडियन्स
16 आणि 19 जानेवारी: विरुद्ध आरसीबी
22 जानेवारी: विरुद्ध युपी वॉरियर्स
27 जानेवारी: विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
30 जानेवारी: विरुद्ध मुंबई इंडियन्स
गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ:
बाथ मुनी, सोफीन, एश्ले गार्डनर, जॉर्जिया व्हेरहम, रेणुका सिंग, यास्तका भाटिया, भारती फुलमाली, कश्वित गौतस, तितासा गुणा, तितासा गुणा, तितासा, किम्थी, किम्थी, किम्थी, किम्थी, किम्थी, तितासा, किम्थी, किम्थी.
Comments are closed.