तामिळनाडूची जनता झुकणार नाही : स्टॅलिन

मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा तमिळ अस्मितेचा मुद्दा उपस्थित

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा तमिळ अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तामिळनाडूचे लोक दबावासमोर स्वत:चे शीर झुकविणार नाहीत असे उद्गार त्यांनी काढले आहेत. पेरियार ईव्ही रामासामी यांच्या 52 व्या पुण्यातिथीनिमित्त श्रद्धांजली वाहत पेरियार यांनी लोकांमध्ये आत्मसन्मान, तर्कसंगत विचार आणि समानतेला प्रोत्साहन दिल्याचे वक्तव्य स्टॅलिन यांनी केले.

तमिळ दबावासमोर झुकणार नाहीत. तर्कसंगत विचार, माणसांवर प्रेम आणि समानता, या सर्वात महान वंशाचा गर्व असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लोकांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. द्रमुक खासदार कनिमोझी यांनीही पेरियार यांना महान समाज सुधारक संबोधित त्यांना आदराजंली वाहिली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सध्या स्वत:च्या वक्तव्यांमध्ये वारंवार तमिळ अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच विचार करता रणनीति अंतर्गत स्टॅलिन हा मुद्दा उचलून धरत असल्याचे मानले जातेय. केवळ तामिळनाडू आणि तमिळ भाषेचे रक्षण करणेच आमचे कर्तव्य नसून आमचे कर्तव्य पूर्ण भारत आणि त्याच्या विविधतेचे रक्षण करणे आहे. पूर्ण भारतात द्रमुक एकमात्र प्रादेशिक पक्ष आहे, जो वैचारिक स्वरुपात भाजप विरोधात लढत आहे.  भाजप केवळ आमच्या तामिळनाडूत यशस्वी होऊ शकलेले नाहीत. तामिळनाडू केवळ प्रेम स्वीकारतो आणि अहंकारासमोर झुकणार नाही असे स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Comments are closed.