Haircare Tips: केसगळतीने हैराण आहात? ट्राय करा एकच रामबाण घरगुती उपाय

आजकाल व्यस्त जीवनशैली, बाहेरील धूळ आणि प्रदूषणामुळं केसांच्या समस्या वाढतात. केसांची निगा राखणं कठीण जातं. परिणामी केस कोरडे, निस्तेज दिसतात. केसगळती जास्त प्रमाणात होते. केसांसाठी अनेक जण नियमितपणे हेअर स्पा किंवा इतर ट्रीटमेंट घेतात. मात्र त्यामुळे तात्पुरता फरक जाणवतो. याच कारणामुळे तुम्हालाही केसगळती होते असेल तर त्यासाठी महागडी उत्पादने, ट्रीटमेंट करण्यापेक्षा एक प्रभावी रामबाण घरगुती उपाय करू शकता. तुम्हाला माहित आहे का? आरोग्यासाठी गुणकारी असलेलं तूप हे केसांसाठीही वरदान आहे. तुपामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. ( Ghee Benefits For Hairs )

असे आहेत फायदे:
शुद्ध तुपात असलेले फॅटी अ‍ॅसिड, जीवनसत्त्वे अ, ड आणि ई केसांना खोलवर पोषण देतात. तूप कोमट करून टाळूला मसाज केल्यास केस मुळापासून मजबूत होतात. तुम्ही जर नियमितपणे केसांसाठी तूप वापरले तर केस पूर्वीपेक्षा निरोगी दिसतात.

जर तुमचे केस कोरडे, निर्जीव दिसत असतील, तर तूप नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. तुपामुळे केस मऊ होतात. हिवाळ्यात केसांना तूप लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

ताणतणाव, असंतुलित आहार आणि प्रदूषणामुळे केसगळती ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. त्यासाठी तुपाने टाळूला हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, केसांची मुळे मजबूत होतात. कालांतराने केसगळती कमी होते.

हेही वाचा: Natural Hair Conditioner: केसांच्या वाढीसाठी बनवा नैसर्गिक कंडिशनर; मुळांना मिळेल पोषण

केसांत कोंडा झाल्यास तूप लावणे फायदेशीर ठरते. कारण तुपातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे टाळू स्वच्छ होतो.

अनेकदा चमकदार केसांसाठी बाहेरचे सीरम वापरले जाते. पण त्यात रसायने असण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक चमक हवी असेल, तर तूप हा एक उत्तम पर्याय आहे. तुपामुळे केस अधिक चमकदार आणि रेशमी दिसतात.

केसांना तूप लावण्यासाठी प्रथम शुद्ध तूप घ्या आणि ते कोमट करा. नंतर तुमच्या बोटांनी टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. मसाजनंतर तुमच्या केसांनाही तूप लावा.एक तासानंतर शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास फायदा होतो.

Comments are closed.