टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स, पठ्ठ्याने रचला अशक्य पराक्रम,
गेडे प्रियंदाना एका षटकात ५ विकेट्स : क्रिकेटच्या मैदानात क्वचितच असे क्षण येतात, जे खेळाच्या सुवर्णपानांवर कायमचे कोरले जातात. बाली येथे खेळल्या गेलेल्या एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात असाच एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. इंडोनेशियाचा युवा वेगवान गोलंदाज गेडे प्रियांदना (Gede Priandana) याने अशक्य वाटणारा पराक्रम करून दाखवत क्रिकेटविश्वाला थक्क केले. एका ओव्हरमुळे प्रियनदानाचे नाव अशा विक्रमांच्या पानावर कोरले गेले आहे, जिथे आजवर जगातील मोठमोठे दिग्गज गोलंदाजही पोहोचू शकले नव्हते.
1 ओव्हर… 1 रन… आणि थेट 5 विकेट्स!
बाली येथे कंबोडियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पार्टटाइम वेगवान गोलंदाज प्रियांदनाने 1 ओव्हरमध्ये फक्त 1 रन देत तब्बल 5 विकेट्स घेतल्या. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासात असे करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. पुरुष क्रिकेटच नव्हे, तर महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आजवर कोणालाही एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेता आलेल्या नव्हत्या. यापूर्वी अनेक गोलंदाजांनी एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत, मात्र 5 विकेट्सचा टप्पा कोणीही गाठू शकले नव्हते. प्रियांदनाच्या या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंडोनेशियाने हा सामना 60 धावांनी जिंकला.
या सामन्यात इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 167 धावा केल्या. सलामीवीर आणि यष्टिरक्षक धर्मा केसुमा यांनी नाबाद 110 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना कंबोडियाने 15 षटकांत 5 विकेट्स गमावत 106 धावा केल्या होत्या. तेव्हाच कर्णधाराने चेंडू गेडे प्रियांदनाकडे सोपवला.
चेंडू हातात येताच त्याने कहर केला. पहिल्या तीन चेंडूवर त्याने शाह अबरार हुसेन, निर्मलजीत सिंग आणि चानथोयून रथानक यांना बाद करत हॅट्ट्रिक साधली. पुढचा एक चेंडू वाया गेला, आणि त्यानंतर मोंगदारा सोक व पेल वेन्नक यांनाही तंबूत पाठवले. कंबोडियाचा संपूर्ण संघ 107 धावांवर ऑलआउट झाला.
टी20 मध्ये एका ओव्हरमध्ये 4 किंवा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज…
- गेडे प्रियांदना(इंडोनेशिया) – कंबोडियाविरुद्ध, 2025 (5 विकेट्स)
- लसिथ मलिंगा (श्रीलंका) – न्यूझीलंडविरुद्ध, 2019 (4 विकेट्स)
- राशिद खान (अफगाणिस्तान) – आयर्लंडविरुद्ध, 2019 (4 विकेट्स)
- कर्टिस कॅम्पफर (आयर्लंड) – नेदरलँड्सविरुद्ध, 2022 (4 विकेट्स)
- जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) – इंग्लंडविरुद्ध, 2022 (4 विकेट्स)
ऐतिहासिक कामगिरी, तरीही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ नाही!
इतिहास रचूनही गेडे प्रियांदनाला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही, हे विशेष ठरले. हा सन्मान धर्मा केसुमाला मिळाला. त्याने 68 चेंडूमध्ये नाबाद 110 धावा करताना 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. केसुमाची ही खेळी इंडोनेशियासाठी निर्णायक ठरली, कारण इतर कोणताही फलंदाज 20 धावांचाही आकडा गाठू शकला नव्हता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.