‘३ इडियट्स’मधील गरीब राजूच्या आईची खरी मुलगी आहे अप्सरेपेक्षा सुंदर,सौंदर्याने जिंकतेय चाहत्यांची मने – Tezzbuzz

काही कलाकार असे असतात की ते सहाय्यक भूमिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवतात. आमिर खानच्या गाजलेल्या ‘३ इडियट्स’ चित्रपटात राजू रस्तोगीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अमरदीप झा याही त्यापैकीच एक. गरीब पण प्रेमळ आईच्या भूमिकेत त्यांनी इतकी प्रभावी छाप पाडली की आजही चित्रपटाचा उल्लेख झाला की त्यांची आठवण येते. भाज्यांच्या किमती समजावतानाचा त्यांचा तो प्रसंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मात्र सध्या चर्चेत अमरदीप झा नाहीत, तर त्यांची मुलगी श्रिया झा आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याची आणि अभिनय कारकिर्दीची चर्चा रंगली आहे.

श्रिया झा (Shriya Jha)ही अमरदीप झा यांची मुलगी असून ती स्वतः एक अभिनेत्री आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रियाने २००८ साली तेलुगू चित्रपट ‘गीता’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने बंगाली चित्रपट ‘तोमर जन्नो’, ‘ओल्ट पोल्ट’ तसेच ओडिया चित्रपट ‘लुचाकली’ आणि ‘अमा भितरे अची’ यामध्ये काम केले आहे.

चित्रपटांसोबतच श्रियाने छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली आहे. ‘झिल मिल सितारों का आंगन होगा’ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय ‘उत्तरन’ या लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘ईशारों ईशारों में’, ‘निमकी मुखिया’, ‘निमकी विधायक’ आणि ‘जिद्दी दिल मान ना’ अशा अनेक मालिकांमधून तिने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.

अमरदीप झा यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पतीच्या निधनानंतर त्यांनी एकट्याने मुलीचा सांभाळ केला आणि अभिनय क्षेत्रातही आपले स्थान टिकवून ठेवले. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुश्मन’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘जख्म’, ‘लज्जा’, ‘देवदास’, ‘मर्डर २’, ‘३ इडियट्स’, ‘पीके’ आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या. आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत श्रिया झा आज अभिनयविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असून, तिच्या कामाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ रिव्ह्यू: जुन्या प्रेमाची गोडी आणि आधुनिक प्रेमकथेची सफर, कार्तिक-अनन्या यांची धमाकेदार जोडी

Comments are closed.