Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..
मी संपूर्ण कोल्हापुराच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो
मी सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून कमी सक्रीय आहे
प्रयत्न करतोय कंटेट देण्याचा
कोल्हापुरात भाजपचा महापौरच बसणार
राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती ती आता पूर्ण होतं आहे. आमची तिसरी पिढी राजकारणात येत आहे. आनंद होतोय कारण आज पर्यंत जे काम केलं ते पुढे घेऊन जायच आहे. रुईकर कॉलनी आणि महाडीक कॉलनी या प्रभागाचा विचार करतोय.
पक्षाने तिकीट का द्यावं? महाडीक आहे म्हणून?
माझ्या तिकीट किंवा निवडणुकीत येण्याचा प्रक्रियेत घरातील कोणी नाही. मला पक्षाकडून आदेश आला आहे. रवींद्र चव्हाण साहेबान यांच्याकडून मेसेज आहे. मी मागच्या निवडणुकीत जिथ गेलो तिथल्या सगळ्या जागा निवडून आल्या. देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे त्यानुसार निर्णय घेतला आहे.
एकीकडे पक्ष आदेश म्हणायच आणि दुसरीकडे तिकिटासाठी वडिलांना घेऊन आलाय?
मी वडिलांसोबत आलो नाही. ते त्यांच्या कमानिमित मुंबईत आहेत. मी माझी दुसरी गाडी घेऊन आलो आहे.
प्रभाग ३ च्या लोकांनी तुम्हाला का निवडून द्याव?
मला केवळ प्रभाग ३ पुरते मर्यादित ठेवू नका. कोल्हापूरचा विचार करतो आहे. मी शहरात काय करता येईल याचा प्लान केला आहे. निधीचा पुरेपूर वापर होतं नाही. त्यासाठी काम करायचं आहे.
लवकरच माझा जाहीरनामा येईल. तरुणांसाठी काय करू शकतो हे देखील तयार केलं आहे.
सत्ता आली तर थेट महापौर पदाची दावेदारी?
सत्ता नक्की आमची येईल आमचे सगळे आमदार आहेत आणि आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत
Comments are closed.