Betel Leaf : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे
सुपारीचे पान अर्थात विड्याचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. अनेकजण तर जेवल्यावर विड्याचे पान खातात. विड्याचे पान केवळ चविलाच नाही तर शरीरासाठी देखील फायद्याचे असते. या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. आज आपण जाणून घेऊयात विड्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे,
- विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये उपयुक्त आहे. सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत अशावेळी विड्याच्या पानांचे सेवन करू शकता.
- घशात खवखव होत असेल तर ज्येष्ठ मध पावडर, कंकोळ, मिरी, कात असलेले विड्याचे पान खावे. यामुळे घसा साफ होतो.
- हल्लीची लाईफस्टाईल आणि बैठे काम यामुळे हृदयावर ताण येत आहे. अशावेळी हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी विड्याचे पान खावे.
हेही वाचा – Garlic : काळ्या आणि पांढऱ्या लसणात फरक काय?
- पोट साफ होत नसेल तर विड्याचे पान देठासकट खावे.
- डोके जड होत असेल, सतत शिंका येत असतील तर विड्याच्या पानाचा काढा तयार करावा. यासाठी विड्याचे पान, चहाची पाती, धणे, आल्याचा तुकडा आणि मिरी यापांसून काढा तयार करावा.
- डाग घालवण्यासाठी विड्याच्या पानांचा वापर करता येईल. मात्र स्किन संवेदनशील असेल तर वापरू नका. यासाठी विड्याच्या पानांची पावडर त्वचेसाठी वापरता येईल.
- विड्याच्या पानांमध्ये अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी आणि दात पिवळे यापासून आराम देतात.
- खोकला, दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात विड्याची पाने खावीत असे सांगण्यात आले आहे.
(टीप – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Health Tips: आवळा खाताना काय काळजी घ्यावी ?
Comments are closed.