2026 मध्ये रोहित आणि कोहली मोडणार 'हे' सर्व रेकॉर्ड्स! जाणून घ्या सविस्तर
टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंनी विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यात शानदार शतकी खेळी खेळून हा संदेश दिला आहे की, ते पुढच्या वर्षीही थांबणार नाहीत. हे दोन्ही दिग्गज आता फक्त वनडे इंटरनॅशनल (ODI) फॉरमॅट खेळतात, त्यामुळे त्यांचे लक्ष अशा मैलाच्या दगडांना स्पर्श करण्यावर असेल, जे मिळवणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. याशिवाय, ते आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही नवीन उंची गाठू इच्छितात. चला जाणून घेऊया 2026 मध्ये ‘रो-को’ कोणते रेकॉर्ड्स मोडू शकतात.
रोहित शर्माने यापूर्वीच शाहिद आफ्रिदीचा वनडेमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला आहे. रोहितने आतापर्यंत 279 वनडे सामन्यात 355 षटकार मारले आहेत. जर त्याने पुढच्या वर्षी आणखी 45 षटकार मारले, तर तो 50 ओव्हरच्या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 400 षटकार ठोकणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल.
रोहित शर्माने वनडेमध्ये आतापर्यंत वेळा 150 पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे, ज्यामध्ये 3 द्विशतकांचा समावेश आहे. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 7 वेळेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि ख्रिस गेल यांचा क्रमांक लागतो (प्रत्येकी 5 वेळा). चाहत्यांना आशा आहे की,2026 मध्ये रोहित शर्मा 9 व्यांदा वनडे डावात 150 धावांचा टप्पा पार करेल.
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी पुरुष ती20 विश्वचषक 2026 चा रोहित शर्मा अधिकृत ब्रँड अँबेसेडर आहे. या भूमिकेची घोषणा आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी 2025 च्या अखेरीस केली होती, ज्यामुळे रोहित या जागतिक स्पर्धेचा अँबेसेडर बनणारा पहिला सक्रिय (active) क्रिकेटपटू ठरला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 308 सामन्यांच्या 296 डावात 14,557 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 433 धावांची गरज आहे. सचिनने आपल्या 377 व्या डावात 15000 धावा पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे विराट कोहली हा विक्रम सहज मोडू शकतो.
विराट कोहलीने आतापर्यंत लिस्ट ए क्रिकेटमध्ये 60 शतके झळकावली आहेत. या बाबतीत तो सचिननंतर दुसऱ्या स्थानावर आहे (सचिनच्या नावावर 100 लिस्ट ए शतके आहेत. त्यामुळे 2026 मध्ये विराट 61 वे लिस्ट ए शतक नक्कीच पूर्ण करेल, अशी आशा आहे.
विराट कोहलीने आधीच वनडेमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सध्या 53 शतके आहेत. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, ‘किंग कोहली’ 2026 मध्ये वनडेमधील 55 शतकांचा आकडा गाठेल.
Comments are closed.