नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन,पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर

नांदेड : जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस (Police) प्रशासनही चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आता नांदेड (Nanded) पोलीस अधीक्षकांनी या घटनेतील मृत व्यक्तींच्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे.

नांदेडच्या जवळा मुरार गावात आज चौघांच्या आत्महत्येची घटना घडली, विशेष म्हणजे आत्महत्या केलल्यांमध्ये दोन तरुण वयाची मुले होती. या मुलांनी रेल्वेखाली उडी घेत आपला जीव दिला. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. गावात जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी भेट दिली. या घटनेतील मृतांच्या घराची पाहणी करत यात काही घातपात आहे का याची तपासणी पोलिसांनी केली. मात्र, सकृतदर्शनी आजारपण आणि आर्थिक तणावातून ही घटना घडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे, घातपात किंवा इतर कारणास्तव ही घटना घडल्याचा चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुर्घटनेतील मृतांची नावे आणि वय- (Nanded News)

उमेश रमेश लखे, वय 25 वर्षे (मुलगा)
बजरंग रमेश लखेस वय 22 वर्षे (मुलगा)
रमेश सोनाजी लखे, वय 51 वर्षे (वडील)
राधाबाई रमेश लाखे, वय ४५ वर्षे (मी)

घटनेमुळे गावावर शोककळा

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील चौघांचे मृतदेह आज आढळले. गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या उमेश अन रमेश या दोन मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले. ही घटना आर्थिक  विवंचनेतून घडल्याला अंदाज गावातील सरपंच प्रतिनिधीने व्यक्त केलाय. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

हेही वाचा

हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव

आणखी वाचा

Comments are closed.