विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 फलंदाज, कोहली-रोहित नाही, तर 'हा' खेळाडू आहे नंबर-1

गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hajare trophy) पहिल्या फेरीत एकूण 19 सामने खेळले गेले. या एकाच दिवशी फलंदाजांचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला आणि तब्बल 22 शतके झळकावली गेली. विशेष म्हणजे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा या दोघांनीही शतके ठोकून चाहत्यांना मोठी भेट दिली. त्यांच्यासोबतच तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीचाही (Vaibhav Suryavanshi) धमाका पाहायला मिळाला. शुक्रवारी आता स्पर्धेची दुसरी फेरी पार पडणार आहे.

या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एक थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. या यादीत जो फलंदाज अव्वल (Top) स्थानी आहे, त्याला अद्याप भारतीय संघातून (Team India) खेळण्याची संधी मिळालेली नाही. इतकेच नाही, तर टॉप-10 फलंदाजांपैकी निम्म्या खेळाडूंनी अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण केलेले नाही.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 फलंदाज

खेळाडू सामने धावा

अंकित बावणे 95 4055
दिनेश कार्तिक ७९ ३४३३
मनीष पांडे 103 3403
प्रियांक पांचाळ 83 3395
मयंक अग्रवाल 72 3390
प्रशांत चोप्रा 81 3280
मनदीप सिंग 101 3238
गणेश सतीश 98 3210
यशपाल सिंग 72 3193
सौरभ तिवारी 89 3190

Comments are closed.