इंग्लंडच्या सलग पराभवानंतर रवी शास्त्रींना मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी! ब्रँडन मॅक्युलम यांचे पद धोक्यात?

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. सलग तीन कसोटी सामने हरल्यामुळे इंग्लंडचे ॲशेस मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा केवळ स्वप्नच राहिले आहे. मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमची ‘बॅझबॉल’ (Bazball) शैली गेल्या काही काळापासून इंग्लंडला चांगलीच महागात पडली आहे. ॲशेस मालिका गमावल्यानंतर आता मॅक्युलम यांना या पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याच दरम्यान, इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने रवी शास्त्री यांना इंग्लंडचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनवण्याचे आवाहन केले आहे. एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना पनेसर म्हणाला की, शास्त्रींकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याचा दांडगा अनुभव आहे. विशेष म्हणजे, शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2018-19 आणि 2020-21 मध्ये कांगारूंचा (ऑस्ट्रेलियाचा) पराभव केला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या मातीवर सलग दोनदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

Comments are closed.