अभिनेत्री गायत्री दातारने होणाऱ्या पतीसोबत रोमँटीक व्हिडीओ केला शेअर

अभिनेत्री गायत्री दातारणे काही दिवसांपूर्वी तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यावेळी तिने तिच्या भावी पतीसोबतचा फोटो शेअर केला होता मात्र त्यात त्याचा चेहरा दाखवला नव्हता तसेच नावही जाहीर केले नव्हते. अखेर गुरुवारी गायत्रीने दातारणे होणाऱ्या पतीसोबत रोमँटीक व्हिडीओ शेअर करत तिच्या पतीचे नाव जाहीर केले आहे.

श्रीकांत चावरे असे तिच्या होणाऱ्या पतीचे नाव असून गायत्रीने त्याच्यासोबत एक रोमँटीक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गायत्रीने गुलाबी रंगाची कॉटनची साडी नेसली असून श्रीकांतने सफेद रंगाचा शर्ट आणि मलई रंगाची पँट घातली आहे.

Comments are closed.