ॲशेसच्या चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, पॅट कमिन्स वर्षातील शेवटच्या कसोटीला मुकला

मेलबर्न: ॲशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंतच्या तीन कसोटीत ऑस्ट्रेलियानं एकतर्फी विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाला एका कसोटी सामन्यात देखील वर्चस्व मिळवता आलेलं नाही. आता चौथी कसोटी 26 डिसेंबर म्हणजे उद्यापासून सुरु होत आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 12 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या कसोटीला देखील नियमित कॅप्टन पॅट कमिन्स मुकला आहे. चौथ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथनं कमबॅक केलं असून तो ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व करेल.

AUS vs ENG 4th Test : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी ॲडिलेड येथे झाली होती. त्या मॅचमध्ये स्टीव्ह स्मिथ खेळला नव्हता. चौथ्या कसोटीत त्यानं कमबॅक केलं असून तो ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असेल. 2025 मधील ही शेवटची कसोटी मॅच आहे. या मॅचसाठी वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन यानं कमबॅक केलं आहे. ज्यानं  2021 नंतर ऑस्ट्रेलियासाठी एकही कसोटी खेळलेली नाही.

चौथ्या कसोटीपूर्वी स्टीव्ह स्मिथनं पत्रकार परिषदेत ॲशेसच्या शेवटच्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व करणार असल्याचं जाहीर केलं. पॅट कमिन्स दुखापतीमुळं खेळत नाही. स्टीव्ह स्मिथ यानं उस्मान ख्वाजा कोणत्या स्थानावर फलंदाजी करणार हे देखील सांगितलं. उस्मान ख्वाजा पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल. बारा पैकी कोणत्या 11 खेळाडूंना संधी द्यायची याचा निर्णय मॅच सुरु होण्यापूर्वी घेतला जाणार आहे.

स्टीव्ह स्मिथ यानं ऑस्ट्रेलिया चार वेगवान गोलंदाजांसह खेळणार असल्याचं जाहीर केलं. प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही स्पिनर नसेल, असंही त्यानं म्हटलं. ॲडिलेड कसोटीत दुसऱ्या डावात 170 धावांची खेली करणारा ट्रेविस हेड मेलबर्नमध्ये देखील डावाची सुरुवात करु शकतो.

चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे 12 खेळाडू : ट्रेविस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलैंड, ब्रेंडन डॉगेट, माइकल नेसर, झाई रिचर्डसन

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.