TVK च्या रॅलींमुळे राजकीय विरोधक घाबरले आहेत: विजय
द्रमुकवर केला गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ चेन्नई
टीव्हीकेच्या यशस्वी सभांमुळे आमचे राजकीय विरोधक घाबरून गेले आहेत. विरोधक आता स्वत:चा खरा चेहरा दाखवू लागले आहेत असे वक्तव्य पक्षाचा अध्यक्ष अन् तमिळ सुपरस्टार विजय थलपति यांनी केले आहे. नव्यानेच स्थापन पक्ष टीव्हीकेचा संस्थापक विजय यांनी राज्यातील सत्तारुढ पक्ष द्रमुकवर तामिळनाडूत भाजपला बळ पुरविण्याचा आरोप केला आहे.
टीव्हीकेने कांचीपुरम, पु•gचेरी आणि इरोडमध्ये तीन यशस्वी सभा पाहिल्या आहेत. जे लोक आम्हाला गप्प बसवू पाहत होते, ते आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या लोकांना पाहून घाबरले आहेत. द्रमुकचे मुखपत्र मुरासोलीच्या संपादकीय लेखात टीव्हीकेला बदनाम करणारा आणि प्रतिष्ठा मलीन करणारा मजकूर आहे. द्रमुकने अत्यंत सामान्य अजेंड्याद्वारे जनतेची दिशाभूल केली आणि 1999-2003 पर्यंत भाजपची गुलामी पत्करली. द्रमुकनेच तामिळनाडूत कमळ फुलू दिल्याचा आरोप विजय यांनी केला.
टीव्हीकेच्या सदस्यांनी द्रमुकची वक्तव्ये आणि एकतर्फी भाषणांकडे दुर्लक्ष करावे. टीव्हीके हा एकमात्र असा पक्ष आहे जो लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य असल्याची जाणीव कार्यकर्त्यांनी जनतेला करून द्यावी असे आवाहन विजय यांनी केले आहे.
Comments are closed.