आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर, रोहित शर्माचा समावेश नाही

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माबद्दल एक आश्चर्यकारक चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियनशिप मिळवून देणाऱ्या रोहितला आयपीएल ऑल-टाइम इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. या संघाची निवड मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू क्रिस जॉर्डनने केली, ज्याने रोहितच्या नेतृत्वाखाली अनेक सामने खेळले आहेत. हा निर्णय चाहत्यांसाठी विशेषतः आश्चर्यकारक आहे.

केवळ रोहित शर्माच नाही तर मुंबई इंडियन्सचा दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्डलाही क्रिस जॉर्डनने निवडलेल्या या ऑल-टाइम इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

जॉर्डनने विराट कोहली आणि ख्रिस गेलला त्याच्या संघाची सलामी जोडी म्हणून निवडले आहे. विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने अनेक वेळा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामी दिली आहे. टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हणून ख्रिस गेलला मानले जाते, त्याने आयपीएलमध्ये अनेक संस्मरणीय डाव खेळले आहेत.

जॉर्डनने मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्स, सुरेश रैना आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश केला आहे. एबी डिव्हिलियर्स त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात, तर सुरेश रैना “मिस्टर आयपीएल” म्हणून ओळखला जातो. सूर्यकुमार यादव अलिकडच्या काळात टी-20 क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक आहे.

एमएस धोनीची यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे आणि त्याला संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याने चेन्नई सुपर किंग्जला अनेक जेतेपदे मिळवून दिली आहेत.

हार्दिक पांड्या आणि सुनील नारायण संघात अष्टपैलू भूमिका बजावतील. दोघांनीही त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने आयपीएलमध्ये अनेक सामने जिंकवले आहेत. गोलंदाजी आक्रमणात जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. बुमराह आणि मलिंगा हे आयपीएलमधील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जातात, तर चहल सातत्याने विकेट घेणारा गोलंदाज आहे.

क्रिस जॉर्डनने निवडलेली आयपीएलची ऑलटाईम प्लेइंग 11-

विराट कोहली, ख्रिस गेल, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, सुनील नारायण, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि युझवेंद्र चहल.

Comments are closed.