दीप्ती शर्माकडे मेगन शुटला मागे टाकून इतिहास रचण्याची मोठी संधी आहे, ती ही कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरणार आहे.

भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (26 डिसेंबर) तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने याआधीच मालिकेत भक्कम आघाडी घेतली असून तिसऱ्या सामन्यातही त्यांची नजर मालिका जिंकण्यावर असेल.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्मा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सौम्य तापामुळे ती दुसऱ्या टी-20 सामन्यात संघाचा भाग होऊ शकली नाही, परंतु आता ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी गुरुवारी (25 डिसेंबर) सामनापूर्व पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की दीप्ती उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे.

दीप्ती शर्माला तिसऱ्या टी-२०मध्ये संधी मिळाल्यास ती गोलंदाजीत मोठा विक्रम करू शकते. दीप्तीने आत्तापर्यंत 130 सामन्यात 18.99 च्या सरासरीने महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 148 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्यापासून ती फक्त चार विकेट्स दूर आहे. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाची अनुभवी वेगवान गोलंदाज मेगन शुटच्या नावावर आहे, जिने 123 सामन्यात 151 बळी घेतले आहेत.

महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज:

  1. मेगन शुट (ऑस्ट्रेलिया) – १५१
  2. दीप्ती शर्मा (भारत) – १४८
  3. हेन्रिएट इशिमवे (रवांडा) – १४४
  4. निदा दार (पाकिस्तान) – १४४
  5. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – १४२

एवढेच नाही तर दीप्ती शर्मा दोन विकेट्स घेऊन भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक विशेष स्थान मिळवेल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल. अर्शदीप सिंगने या फॉरमॅटमध्ये भारतीय पुरुष संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, ज्याच्या नावावर 72 सामन्यांमध्ये 110 विकेट्स आहेत.

Comments are closed.