तामिळनाडूत अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.

टायर फुटल्याने बसची दोन कारना धडक, चार जण जखमी : मृतांमध्ये पाच पुरुष, चार महिलांचा समावेश

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूच्या कु•ालोर जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या एका अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्य महामार्गावर तिरुचिरापल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या परिवहन बसचा टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली. बस अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळून विरुद्ध लेनमध्ये जात समोरून येणाऱ्या दोन गाड्यांना आदळली. यात दोन्ही गाड्या बसखाली अडकल्यामुळे पूर्णपणे चिरडल्या गेल्या. या अपघातात दोन्ही कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन मुलांसह चार जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच तिरुचिरापल्ली आणि रामनाथम येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना तिरुचिरापल्ली आणि पेरम्बलूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे चेन्नई-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर अनेक किलोमीटर लांबपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केल्यानंतर सुमारे दोन तासांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून 3 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत आणि उपचारांची सुविधा मोफत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Comments are closed.