शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
शरद पवार NCP उमेदवार यादी BMC निवडणूक 2026: मुंबई महापालिकासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Sharad Pawar NCP) उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती (Shivsena UBT And MNS Yuti) जाहीर झाली असताना शरद पवारांची राष्ट्रवादीने ठाकरे गटासह काँग्रेससोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. याचदरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. (BMC Election 2026)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे-
- मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रभाग क्रमांक 131
- माजी नगराध्यक्षा मनीषा रहाटे- प्रभाग क्रमांक 119
- जिल्हाध्यक्ष अजित रावराणे- प्रभाग क्रमांक 43
- जाहिदा सिराज अहमद- प्रभाग क्रमांक १२४
- माजी नगरसेवक धनंजय पिसाळ- प्रभाग क्रमांक 111
- रुई खानोलकर प्रभाग क्रमांक- प्रभाग क्रमांक 170
जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट- (Jayant Patil Meet Uddhav Thackeray)
आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडीसंदर्भात चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे. आज दुपारी 1 वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान-
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)
शिवसेना- 84
भाजप- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.