26 डिसेंबरपासून पंढरपूरच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी

पुढील वर्षीच्या पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या सर्व पूजांचे ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा, पाद्यपूजा आणि इतर प्रकारच्या पूजा मिळवण्यासाठी देशभरातली भाविक प्रयत्न करीत असतात. आता नवीन वर्षात 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठीच्या पूजांचे ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचे मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात भाविकांना पूजा करायची असल्यास 26 डिसेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग केल्यास त्यांना देवाच्या पूजेची संधी मिळू शकणार आहे.

Comments are closed.