विजेत्या आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 7 कोटींच्या खेळाडूला जागा नाही? दिग्गज क्रिकेटपटूच्या दाव्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ!

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबले (Anil Kumble) यांनी दावा केला आहे की, आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये व्यंकटेश अय्यरला (Venkat Iyer) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळणार नाही. लिलावात 7 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या खेळाडूबद्दल कुंबले यांनी केलेल्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कुंबले यांनी आरसीबीच्या रणनीतीवर भाष्य केले, कुंबले यांच्या मते, आरसीबीने गेल्या वेळी ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे संघात अचानक मोठे बदल करून विजेत्या संघात संभ्रम निर्माण करण्याची फ्रँचायझीची इच्छा नसेल. आरसीबीने रवी बिश्नोईला लिलावात न घेण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे आधीच सुयश शर्मा आहे. सुयशच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी बिश्नोईला टाळले, असे कुंबले म्हणाले.

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) व्यंकटेश अय्यरला रिलीज केले होते. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सनेही त्याला घेण्यास रस दाखवला होता. केकेआरने 6.80 कोटींपर्यंत बोली लावली, पण त्यापुढे जाणे त्यांना योग्य वाटले नाही. शेवटी 7 कोटी रुपयांना आरसीबीने त्याला आपल्या संघात घेतले.

आयपीएल कारकिर्दीत त्याने 56 डावात 1468 धावा केल्या आहेत यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 2025 मध्ये व्यंकटेशचा फॉर्म खराब होता. त्याने 7 डावात केवळ 142 धावा केल्या होत्या.

Comments are closed.