अजित पवार हे थेट आझम पानसरेंच्या भेटीला, पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग
अजित पवार : राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकाची आणि नव्यानं तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 या दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंची युती झाली. शिवसेना आणि भाजप यांची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट आझम पानसरे यांच्या भेटीला आले आहेत. पानसरे हे पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आझम पानसरेंना हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट आझम पानसरे यांच्या भेटीमागे नेमकं काय कारण असेल? याबाबत चर्चा रंगलेल्या आहेत. काल आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे काल आझम पानसरेंच्या घरात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी बैठक घेतली होती. तर भाचा जिशानच्या कार्यालयात दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्यामुळं आज अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र आणण्याच्या अनुषंगाने चर्चा करायला आलेत की मुलगा निहाल नंतर आझम पानसरेंना ही स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण द्यायला आलेत. याबाबत चा खुलासा स्वतः अजित पवार हेच करतील असं बोललं जात आहे.
पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब
पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून, केवळ दोन जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री तासभर चाललेल्या चर्चेत, शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सुलक्षणा शिलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्या जागांसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवारांनीही दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत आपल्याला या दोन्ही जागा घ्यायच्याच, असा मेसेज कोल्हे आणि रोहित पवारांकडे दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही येत्या एक-दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pimpri Chinchwad Election : पिंपरीत आम्ही 128 पैकी 125 जागा जिंकणार, अजितदादांना फक्त तीनच जागा मिळणार; भाजप आमदाराचा मोठा दावा
आणखी वाचा
Comments are closed.