ध्रुव शौरीचा धमाका! सलग 5 शतके ठोकून रचला इतिहास, जगदीशनच्या जागतिक विक्रमाशी साधली बरोबरी
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये विदर्भच्या ध्रुव शौरीने आपल्या फलंदाजीने खळबळ माजवून दिली आहे. 26 डिसेंबर रोजी हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने शानदार शतक झळकावले. हे त्याचे लिस्ट-ए (ODI) क्रिकेटमधील सलग पाचवे शतक ठरले आहे.
ध्रुव शौरीने आता तामिळनाडूच्या एन जगदीसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जगदीसनने 2022-23 च्या हंगामात सलग 5 शतके ठोकली होती. या यादीत आता ध्रुव शौरीचे नावही अग्रक्रमाने घेतले जाईल. त्याने देवदत्त पडिक्कल आणि कुमार संगकारा (सलग 4 शतके) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
ध्रुव शौरीचा हा शतकी धडाका गेल्या हंगामाच्या बाद फेरीपासून (Knockout) सुरू झाला आहे. गेल्या हंगामात सेमीफायनलमध्ये शतक, फायनलमध्ये शतक, या हंगामातील पहिल्या सामन्यात बंगालविरुद्ध 136 धावा त्याने केल्या आहेत.
या हंगामातील दुसऱ्या सामन्यात त्याने हैदराबादविरुद्ध 77 चेंडूंत नाबाद 109 धावा (9 चौकार, 6 षटकार सामील होते.
ध्रुव शौरीच्या (109*) नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भने 50 षटकांत 365 धावांचा डोंगर उभा केला. त्याला अमन मोखाडे (82) आणि यश राठोड (68) यांनी चांगली साथ दिली. 366 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 276 धावांवर गारद झाला. विदर्भने हा सामना 89 धावांनी जिंकला.
ध्रुव शौरी आयपीएलमध्ये 2018 आणि 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळला आहे. तो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला खेळाडू आहे. आता सलग पाच शतके ठोकून त्याने भारतीय संघाच्या निवडीसाठी आपला प्रबळ दावा सादर केला आहे.
Comments are closed.