न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ, 'या' खेळाडूंचे होणार पुनरागमन
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे (एकदिवसीय) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना (11 जानेवारी) रोजी होईल. सध्या बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु 4 जानेवारीला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या मालिकेच्या माध्यमातून शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागील वनडे मालिकेत शुबमन गिल दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, तर श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे त्या मालिकेचा भाग नव्हता. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू या मालिकेद्वारे भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ:
शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, के.एल. राहुल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग.
Comments are closed.