कृति सेननने नुपूर–स्टेबिनचं नातं कन्फर्म केलं का? ख्रिसमसला सेनन कुटुंबासोबत दिसला गायक; पाहा फोटो – Tezzbuzz
बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सोशल मीडियावर फारच निवडक आणि खास प्रसंगीच कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. नुकतेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी तिने तिच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले असून, या फोटोंमुळे तिच्या बहिणी नुपूर सॅननच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
या फोटोंमध्ये कृतिचे आई-वडील, बहीण नुपूर आणि प्रसिद्ध गायक स्टेबिन बेन एकत्र दिसत आहेत. सर्वजण उत्साही आणि आनंदी मूडमध्ये साजरा करताना पाहायला मिळत आहेत. एका फोटोमध्ये क्रिती आपल्या बहिणीला मिठी मारताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
कृतिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “क्रिसमस पोस्ट उशिरा आली आहे, कारण आम्ही सेलिब्रेशनमध्ये खूप बिझी होतो” आणि त्यासोबत हार्ट व स्मायली इमोजी जोडले आहेत.
ख्रिसमस पोस्टमधून नुपूर–स्टेबिनच्या नात्याला दुजोरा? या फोटोंमध्ये नुपूर सनॉन (Nupur Sanon)आणि गायक स्टेबिन बेन यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे क्रितीने अप्रत्यक्षपणे दोघांच्या नात्याची पुष्टी केली असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे, मिळालेल्या माहितीनुसार नुपूर आणि स्टेबिन लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, ११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये त्यांचा विवाह होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप क्रिती किंवा तिच्या कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तरीही, ख्रिसमसच्या या खास फोटोंमुळे नुपूरच्या लग्नाची बातमी जवळपास निश्चित मानली जात आहे.पुढील वर्षी कोणत्या चित्रपटांत दिसणार क्रिती सॅनन? कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, यावर्षी कृति सेनन धनुषसोबत ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात झळकली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आगामी वर्षात कृति सेनन शाहिद कपूरसोबत ‘कॉकटेल २’ या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता असून, तो पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.