दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!

मराठी ‘बिग बॉस’ची घोषणा नुकतीच झाली आहे. कार्यक्रमाच्या थीमविषयी कल्पना देणारा एक नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!’ या दमदार थीमसह ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘फॅन्सचा जीव जडला की, ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत’ अशा शब्दांत रितेश देशमुख सीझनची हिंट देताना प्रोमोमध्ये दिसतात. ‘बिग बॉस मराठी’चा हा सहावा सीझन कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 11 जानेवारीला रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.

Comments are closed.