Chandrapur crime news – बंदुकीचा धाक दाखवून कंत्राटदाराकडून उकळले 18 लाख, तीन आरोपींना अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बांधकाम कंत्राटदाराचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल 18 लाख 50 हजार रुपके उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील शनि मंदिर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपांना अटक केली आहे. आकाश वाढई, भारत माडेश्वर, योगेश गोरडवार अशी आरोपींची नावे आहेत.

Comments are closed.