AUS vs ENG: लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला स्टीव्ह स्मिथ? सांगितलं पराभवाचं खरं कारण

अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes 2025) चौथा कसोटी सामना 26 आणि 27 डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला गेला. या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत इंग्लंडने कमालीची कामगिरी करत अवघ्या 2 दिवसांत विजय मिळवला. तब्बल 14 वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नच्या मैदानावर कसोटी विजय मिळवून हा सामना संस्मरणीय ठरवला. मात्र, या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

सामना गमावल्यानंतर स्मिथने पराभवाचे खरे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, हा सामना खूप कठीण आणि वेगवान होता. जर आम्ही पहिल्या डावात अतिरिक्त 50-60 धावा केल्या असत्या, तर कदाचित आम्ही शेवटपर्यंत लढलो असतो. खेळपट्टी अपेक्षेप्रमाणेच होती, पण चेंडू जुना आणि नरम झाल्यानंतर तो मी विचार केला होता तसा फिरत नव्हता.

स्मिथ पुढे म्हणाला, खेळपट्टीने गोलंदाजांना अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली. जेव्हा दोन दिवसांत 36 विकेट्स पडतात, तेव्हा खेळपट्टीचा प्रभाव किती मोठा होता हे समजते. कदाचित खेळपट्टीवर गवत थोडे कमी असते किंवा तयारी वेगळी असती तर निकाल वेगळा लागला असता.

मालिकेतील पहिले तीन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते, पण चौथ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत 4 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 152 धावांवर आटोपला, तर
इंग्लंडचा पहिला डाव 110 धावात संपल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 42 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 132 धावा केल्या. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 178 धावा करत दुसऱ्याच दिवशी सामना जिंकला.

Comments are closed.