माजी CSK स्टारचा वर्ल्ड रेकॉर्ड! सलग 5 सामन्यांत 5 शतके ठोकून क्रिकेट विश्वात खळबळ

26 डिसेंबर रोजी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hajare trophy) सामन्यात विदर्भने हैदराबादचा 89 धावांनी पराभव केला. या विजयाचा खरा नायक ठरला ध्रुव शोरे, ज्याने 109 धावांची नाबाद शतकीय खेळी केली. या शतकासह ध्रुवने एका मोठ्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे.

ध्रुव शोरेचे लिस्ट-ए (ODI फॉरमॅट) क्रिकेटमधील हे सलग पाचवे शतक होते. सलग 5 डावात शतके ठोकणारा तो आता जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी भारताच्याच एन. जगदीशन याने सलग 5 शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. आता ध्रुव शोरे त्याच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आता ध्रुवचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. कुमार संगकारा, करुण नायर, देवदत्त पडिक्कल आणि अल्वीरो पीटरसन यापैकी संगकारा हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 4 शतके झळकावली आहेत.

विदर्भने हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 365 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 276 धावांवर बाद झाला. ध्रुव शोरेने आपले शतक 141.5 च्या तुफानी स्ट्राईक रेटने पूर्ण केले. ध्रुव हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग राहिला आहे.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या गुणतालिकेत (Points Table) विदर्भचा संघ सध्या ‘ग्रुप बी’ मध्ये चौथ्या स्थानावर आहे.

Comments are closed.