Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे

Khopoli Mangesh Kalokhe Death : खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर, नगरसेविका झाल्यानंतर दोनच दिवसात पतीची हत्या
रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल हत्या करण्यात आलीये… आणि या हत्येचा सीसीटीव्ही आता समोर आलाय…धारदार शस्त्राचा वापर करून मंगेश काळोखेंची हत्या केल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसतंय…तर हत्या करताना दगड, तलवारीचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळालीये… पोलिसांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे,रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केलाय.. तर, आज सकाळीच मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केलीये..
हत्या प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यात जोरदार राजकारण पेटलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आरोपांची तोफ डागलीये. सुनील तटकरे रायगडचे आका आहेत… तटकरेंच्या सांगण्यावरून विरोधकांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोपही थोरवेंनी केलाय. तर मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावाही थोरवेंनी केलाय. मात्र, घडलेली घटना निर्दयी असून राजकारण करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिलीये. घटनेचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी, अशी प्रतिक्रियाही तटकरेंनी दिलीये…

Comments are closed.