ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

सुदृढ राहण्यासाठी शरीराबरोबरच दातांची काळजी घेणेही गरजेचे आहे. कारण आपण जे काही अन्न खातो ते दातांमुळेच शरीरात जाते. म्हणूनच तज्त्र नेहमी दात स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. या सल्ला्यानुसार आपल्याला दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला दिला जातो. एक सकाळी उठल्यावर आणि दुसरा रात्री झोपण्याआधी. पण रात्रीचे जेवण झाल्यावर किती वेळाने ब्रश करावा हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहीतच नाही. आज आपण तेच समजून घेऊया.

ब्रश करण्याची वेळ
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी झोपून उठल्य़ावर आणि रात्री झोपण्याआधी ब्रश करणे दातांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. कारण दिवसभरात आणि रात्री जेवणात आपण जे काही अन्नपदार्थ खाल्लेले असतात त्यांच्या सूक्ष्म कणांचा थर आपल्या दातांवर जमा झालेला असतो. त्यात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे रात्री ब्रश केल्याने दात स्वच्छ होतात.

सकाळचा नाश्ता आणि ब्रश

सकाळी नाश्त्याआधी ब्रश करणे आवश्यक असते. त्यामुळे दातावरील थर स्वच्छ होतो. दात स्वच्छ होतात.

काहीजण नाश्त्त्यानंतर ब्रश करतात. पण तसे केल्याने दातांवर अॅसिडीक अन्नकण जमा होतात. ज्यामुळे दातांचे नुकसान होते. म्हणूनच नाश्ता केल्यानंतर ३० ते ५० मिनिटात ब्रश करावा.

दात घासण्याआधी ब्रश ओला करून घ्यावा.
फलोराईड असलेले टुथपेस्ट वापरावे.
दोन मिनिटच ब्रश करावा. यात दाताच्या पुढील मागच्या खालच्या वरच्या भागात ब्रश करावा.
जीभही स्वच्छ करावी
टूथपेस्ट गिळू नये ती थुंकून टाकावी

Comments are closed.