न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून 'हे' 5 भारतीय खेळाडू बाहेर? टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठे प्रश्नचिन्ह
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असला, तरी या मालिकेसाठी संघाची निवड कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही खेळाडू या वनडे मालिकेचा भाग नसतील, कारण आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआय (BCCI) त्यांच्या फिटनेसबाबत कोणतीही जोखीम पत्करणार नाही.
100% फिटनेस राखण्यासाठी या खेळाडूंना मालिकेतून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह (Hardik pandya & Jasprit Bumrah) हे दोघेही भारताचे ‘मॅच विनर’ खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या दुखापतींचा इतिहास पाहता त्यांना या वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
टी-20 फॉरमॅटमधील भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) यालाही या वनडे मालिकेसाठी संघातून बाहेर ठेवले जाऊ शकते. इतर काही खेळाडू जे टी-20 वर्ल्ड कपच्या नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहेत, त्यांनाही विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंटवर भर देत आहे.
Comments are closed.