IND vs PAK: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! जाणून घ्या 2026 मधील सामन्यांबद्दल संपूर्ण माहिती

2025 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला तब्बल 3 वेळा धूळ चारली. आता 2026 मध्येही या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.

पुरुष टी-20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो, श्रीलंका येथे भारतीय संघ 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. 2024 च्या टी-20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद मिळवले होते.

अंडर-19 विश्वचषक 2026 झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने नसले तरी, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये त्यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध खेळेल.

महिला टी-20 विश्वचषक 2026 या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेचा मुख्य थरार 12 जूनपासून सुरू होणार आहे. पण सर्वांचे लक्ष लागलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांसाठी त्यांच्या मोहिमेची सुरुवात याच सामन्याने होईल.

Comments are closed.