वैभव सूर्यवंशीकडे भारताच्या अंडर-19 संघाचे कर्णधारपद; वर्ल्ड कपसाठीही संघ जाहीर
बीसीसीआयने आयसीसी मेन्स अंडर-19 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताच्या अंडर-19 संघाचाही ऐलान करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, वर्ल्ड कपमध्ये मात्र आयुष म्हात्रे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा हे दोघेही सध्या मनगटाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या मालिकेत ते सहभागी होऊ शकणार नाहीत. दोघांनाही पुढील उपचार आणि पुनर्वसनासाठी BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले असून, ते आयसीसी U19 वर्ल्ड कप 2026 साठी पूर्णपणे फिट असतील, असा बोर्डाला विश्वास आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय U19 संघ-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात अनुभव आणि नवोदित खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे.
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरॉन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.
आयसीसी मेन्स U19 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह आणि उद्धव मोहन.
भारतीय U19 संघाने मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, वर्ल्ड कप 2026 मध्येही भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिका दौरा हा या तरुण खेळाडूंसाठी मोठी संधी मानली जात असून, आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Comments are closed.