पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेनं शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला मोठी माहिती दिली आहे. 26 डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर बँकेनं  एका रिपोर्टमध्ये बँकेत 2434 कोटींचा कर्ज घोटाळा झाल्याची माहिती दिली आहे. बँकेनं SREI ग्रुपच्या दोन संस्थांच्या माजी प्रमोटर्स संबंधांतील 2434 कोटींच्या कर्ज घोटाळ्याची माहिती दिली आहे.

बँकेनं सांगितलं की त्यांनी SREI इक्विपमेंट फायनान्स लिमिटेडच्या खात्यात 1240.94 कोटी रुपये आणि SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडच्या खात्यात 1193.06 कोटींच्या फसवणुकीचा शोध घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेनं हेदेखील स्पष्ट केलं की वितरित रकमेसाठी पहिल्यापासून 100 टक्के तरतूद करुन ठेवली आहे.

फायलिंगमध्ये बँकेनं म्हटलं की या कंपन्यांनी NCLT द्वारे कॉर्पोरेट दिवाळखोरी तडजोड प्रक्रियेद्वारे यशस्वीपणे मार्ग काढला आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा शेअर शुक्रवारी 60 पैशांच्या घसरणीसह 120.35 रुपयांवर बंद झाला होता. दीर्घकाळाचा विचार केला असता बँकेचा शेअर मजबूत स्थितीत आहे. गेल्या सहा महिन्यात बँकेचा शेअर 13 टक्क्यांनी वाढला आहे. 2025 मध्ये बँकेच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

SREI ग्रुप काय करतो?

या ग्रुपच्या वेबसाईटनुसार एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड 1989 पासून  कार्यरत आहे.SREIनं नंतर इन्फ्रास्ट्रक्चर लोन क्षेत्रात विस्तार केला. पहिल्यांदा ही फायनान्स कंपनी दाखवली गेली, त्यानंतर एनबीएफसी, गुंतवणूक आणि कर्ज कंपनी म्हणून रजिस्टर करण्यात आलं. त्यानंतर 2011 मध्ये कॉर्पोरेट मंत्रालयाकडून पब्लिक फायनान्स म्हणून नोटिफाय करण्यात आली.

सप्टेंबरच्या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेनं त्यांचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ नोंदवली होती. बँकेनं निव्वळ नफा 4904 कोटी रुपये कमावला होता.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.