Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
पुण्यातील गुंड बंडू आंदेकरने आज चांगलीच शोबाजी केलीये… कोर्टाच्या परवानगीनंतर पुणे पालिकेची निवडणूक लढण्यासाठी बंडू आंदेकर थेट तुरुंगातून भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात दाखल झाला.. कडक पोलीस बंदोबस्तात तोंडाला कापड गुंडाळलेलं आणि हातात बेड्या अशा अवतारात पोलिसांनी त्याला कार्यालयात आणलं.. कार्यालयात दाखल होताचं आंदेकरने व्हिक्ट्री साईन दाखवलं.. तसंच ओरडत घोषणाबाजीही केली.. त्याच्यासोबत सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर देखील अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या..  मात्र या तिघांनीही उमेदवारी अर्जसोबत जोडायची कागदपत्रे आणली नव्हती.. त्याचबरोबर तिघांच्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या देखील नव्हत्या. त्यामुळे तिघेही अधिकाऱ्यांशी बोलणी करून निघून गेले.. जाताना त्यांनी त्यांचे अर्जही सोबत नेले.. दरम्यान आंदेकर आता त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज भरू शकतात, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय

Comments are closed.