मेलबर्न कसोटी दोन दिवसात संपली, मालिका जिंकली पण ऑस्ट्रेलिया गोत्यात, तब्बल 60 कोटींचा फटका

नवी दिल्ली : ॲशेसमधील मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला 4 विकेटनं पराभूत केलं. बॉक्सिंग डे कसोटी केवळ दोन दिवसात संपली. चौथ्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत 3-1  अशा आघाडीवर आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यानं इंग्लंडला दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली असली तरी मेलबर्न कसोटीतील पराभवासह मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियानं ॲशेस मालिका जिंकली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया नाराज आहे. 2025-26 ची ॲशेस मालिका जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान झालंय.

2024-25 हे आर्थिक वर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी चांगलं राहिलेलं नाही. भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्याचं आयोजन करुन देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 68.05 कोटींचं नुकसान झालं होतं. 2025-26 च्या ॲशेसमध्ये हा तोटा भरुन निघेल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटलं होतं. मात्र, त्यांचं पुन्हा नुकसान झालं आहे.

AUS vs ENG 60 कोटी रुपयांचं नुकसान

पर्थ कसोटी केवळ दोन दिवसात संपल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान झालेलं. पर्थ कसोटी दोन दिवसात संपल्यानं त्या  30 कोटी रुपयांचं नुकसान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला स्वीकारावं लागलं होतं. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये झालेली चौथी कसोटी देखील 2 दिवसात संपली. यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आणखी 30 कोटींचं नुकसान झालं. म्हणजेच ॲशेसमध्ये आतापर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला  60.22 कोटींचं नुकसान स्वीकारावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाच पहिल्या दिवशी प्रेक्षक संख्या 94199 होती. दुसऱ्या दिवशी प्रेक्षक संख्या 92045 होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसाच्या तिकिटांची विक्री पूर्ण झाल्याचं सांगितलं  होतं. चौथ्या दिवसाच्या तिकिटांना मोठा प्रतिसाद होता. मात्र, कसोटी दुसऱ्याच दिवशी संपल्यानं प्रेक्षकांचे परत देण्याची वेळ क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी कमी कालावधीच्या कसोटी सामन्यांमुळं नुकसान होत असल्याचं सांगितलं.

मेलबर्न कसोटी दोन दिवसात संपली

ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 152 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 110 धावा करु शकल्यानं ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळाली होती.  ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 132 धावांवर बाद झाला. यामुळं इंग्लंडला विजयासाठी 175 धावांचं आव्हान मिळालं होतं. जॅक क्रॉलीनं  37, बेन डकेट यानं  34 धावा, जॅकब बेथेल यानं 40 धावा केल्या. इंग्लंडनं 6 विकेट गमावून ही कसोटी जिंकली. इंग्लंडच्या जोश टंग याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.