साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 डिसेंबर 2025 ते शनिवार 03 जानेवारी 2026
>> नीलिमा प्रधान
जाळी – अतिशयोक्ती नको
मेषेच्या भाग्येषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. श्री शाकंभरी देवीच्या उत्सवाचा आशीर्वाद लाभेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय वाढेल. अतिशयोक्ती नको. नोकरीधंद्यात सुधारण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल.
शुभ दिवस. 1, 2
वृषभ – प्रगतीची संधी लाभेल
वृषभेच्या अष्टमेषात बुध, सूर्य चंद्र षडाष्टक योग. वर्षाची सुरूवात दगदगीची असली तरी प्रगतीची संधी लाभेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. भावनेच्या आहारी जाऊ नका. नम्र रहा.
शुभ दिवस. 2, 3
मिथुन – गुंतवणूक करा
मिथुनेच्या सप्तमेषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. नोकरीधंद्यात प्रशंसा होईल. गुंतवणूक करा. घरातील ताण कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळेल. लोकप्रियता वाढेल.
शुभ दिवस. २८, २९
कर्करोग – अतिशयोक्ती टाळा
कर्केच्या षष्ठेशात बुध, सूर्य चंद्र षडाष्टक योग. आत्मविश्वास वाढेल. अतिशयोक्ती टाळा. व्यसन, मोह दूर ठेवा. संतापजनक घटना घडतील. वरिष्ठांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. गैरसमज, आरोप होतील.
शुभ दिवस. २८, १
सिंह – कार्यारंभ कराल
सिंहेच्या पंचमेशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रातील तणाव दूर होतील. नव्या उमेदीने कार्यारंभ करा. धंद्यात दिशा मिळेल. योजना गतिमान होतील. वातावरण उत्साही राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करा.
शुभ दिवस. 1, 3
कन्या – प्रवासात घाई नको
कन्येच्या सुखेषात बुध, चंद्र गुरू लाभयोग. क्षुल्लक कारणाने तणाव वाढतील. प्रवासात घाई नको नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. संयम बाळगा. कायद्याला धरून वागा. वस्तू सांभाळा.
शुभ दिवस. २८, ३
तूळ – योजनांना गती मिळेल
तुळेच्या पराक्रमात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर गैरसमज, तणाव जाणवतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. उत्तम परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. जुना वाद मिटवता येईल.
शुभ दिवस. 29, 3
वृश्चिक – कामे पार पडतील
वृश्चिकेच्या धनेषात बुध, चंद्र शुक्र केंद्र योग. न होणारी कामे करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामे वाढतील पण बदलीची शक्यता. धंद्यात नवे धोरण ठरवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. करार करताना सावध रहा.
शुभ दिवस. २८, १
धनु – अहंकार दूर ठेवा
स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग. अडथळे दूर करून ध्येय गाठता येईल. कार्यक्रमाची रूपरेखा तयार करून तुमच्या क्षेत्रात प्रगती करा.अहंकाराची भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील.
शुभ दिवस. 29, 3
मकर – रागावर नियंत्रण ठेवा
मकरेच्या व्ययेषात बुध, चंद्र शनि लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो प्रलोभनाला बळी पडू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. अनाठायी खर्च होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णयाची घाई नको.
शुभ दिवस. २८, १
कुंभ – महत्त्वाची कामे करा
कुंभेच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. श्रीदेवीच्या कृपेने संकट दूर होईल. जमिन, वाहन, घर खरेदी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह वाढेल. यश मिळेल.
शुभ दिवस. 29, 3
मीन – किचकट प्रश्न मार्गी लावा
मीनेच्या दशमेशात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. किचकट प्रश्न मार्गी लावा. कायद्याला धरून निर्णय घ्या. नोकरीत प्रशंसा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. संधी सोडू नका. प्रगती होईल.
शुभ दिवस. 29, 1
Comments are closed.