टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिक
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: भारतीय क्रिकेट संघाच्या वनडे योजनांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत. 2025-26 हंगामातील शेवटची घरच्या मैदानावरील वनडे मालिका म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संघातील एका स्टार खेळाडूला टी-20 नंतर आता वनडेतूनही वगळले जाऊ शकते. गेल्या काही काळापासून हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे आणि आता एका जबरदस्त फॉर्ममधील खेळाडूकडून त्याची जागा घेतली जाण्याची शक्यता आहे.
वनडे संघातून बाहेर पडणार ‘हा’ स्टार खेळाडू
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती 3 जानेवारी किंवा रविवार, 4 जानेवारीला संघ जाहीर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला या मालिकेसाठी डच्चू दिला जाऊ शकतो. संघ व्यवस्थापन फॉर्म आणि संघरचनेचा विचार करून नव्या दिशेने पाऊल टाकण्याच्या मूडमध्ये आहे. ही मालिका 11 ते 18 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. याआधीच पंतला टी-20 वर्ल्ड कप 2026 साठीच्या संघात स्थान मिळू शकले नव्हते. आता त्याच्या जागी ईशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीमुळे ईशानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पंतचा वनडे कारकिर्दीतला अडसर
ऋषभ पंतने आपला शेवटचा वनडे सामना ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडील मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले होते, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता निवडकर्त्यांनी न्यूझीलंड मालिकेसाठी पंतपासून पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत आहेत. सध्या विकेटकीपर-फलंदाज म्हणून केएल राहुल ही संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती आहे. त्यामुळे पंतला सातत्याने संधी मिळत नाही, आणि त्यातच ईशान किशनचा तगडा फॉर्म पंतसाठी मोठा धोका ठरत आहे.
दोन वर्षांनंतर ईशान किशनची वनडे पुनरागमनाची आशा
ईशान किशन जवळपास दोन वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियासाठी त्याचा शेवटचा 50 षटकांचा सामना 2023 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली येथे झाला होता. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत स्वतःचा दावा पक्का केला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा करत त्याने झारखंडला पहिले विजेतेपद मिळवून दिले आणि अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध शतक झळकावले. हा फॉर्म त्याने विजय हजारे ट्रॉफीतही कायम ठेवला. 24 डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकत त्याने भारतीय लिस्ट-ए क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ईशान किशन निवडकर्त्यांसमोर मजबूत दावेदार ठरत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.