यंदा सर्वाधिक कमाई करणारे जगातील 7 क्रिकेटपटू; निवृत्तीनंतरही विराट कोहली नंबर-1

Year Ender 2025: 2025 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले. अनेक संघ आणि खेळाडूंनी नवनवीन विक्रम रचले. क्रिकेटची लोकप्रियता वाढत असताना खेळाडूंच्या कमाईतही मोठी वाढ झाली आहे. आयपीएल, बीसीसीआय/क्रिकेट बोर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आणि ब्रँड एंडोर्समेंटमुळे क्रिकेटर्स आज कोट्यवधींची कमाई करत आहेत. 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंची यादी पुढीलप्रमाणे आहे.

विराट कोहली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला. वर्षात त्याची एकूण कमाई अंदाजे 250 ते 300 कोटी रुपये इतकी आहे. IPL करारातून त्याला सुमारे 21 कोटी, तर BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 7 कोटी रुपये मिळाले. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंटमधून कोहलीने मोठी कमाई केली.

रोहित शर्मा
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये त्याची एकूण कमाई 150 ते 180 कोटी रुपये इतकी राहिली. आयपीएल आणि बीसीसीआय करारातूनच त्याने सुमारे 23.30 कोटी रुपये कमावले असून, जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधूनही त्याला भरघोस उत्पन्न मिळाले.

ऋषभ पंत
भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू मागील काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. 2025 मध्ये पंतने अंदाजे 100 ते 120 कोटी रुपये कमावले असून, तो भारतातील टॉप कमाई करणाऱ्या क्रिकेटर्समध्ये सामील झाला आहे.

जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमाईही उल्लेखनीय ठरली. आयपीएल, बीसीसीआय करार आणि ब्रँड एंडोर्समेंट त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत. 2025 मध्ये बुमराहने सुमारे 90 ते 110 कोटी रुपये कमावले.

हार्दिक पंड्या
आलिशान जीवनशैली, महागड्या घड्याळांचा शौक आणि स्टायलिश ड्रेसिंगसाठी ओळखला जाणारा हार्दिक पांड्या नेहमीच लाईमलाइटमध्ये असतो. 2025 मध्ये हार्दिकने अंदाजे 80 ते 100 कोटी रुपये कमावले.

श्रेयस अय्यर
भारतीय संघातील वाढत्या भूमिकेचा फायदा श्रेयस अय्यरला कमाईतही झाला. वनडे संघाचा सध्याचा उपकर्णधार असलेल्या अय्यरने 2025 मध्ये सुमारे 70 ते 85 कोटी रुपये कमावले.

पॅट कमिन्स
या यादीतील एकमेव परदेशी खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिळणारा पगार आणि आयपीएलमुळे त्याची कमाई मोठी आहे. 2025 मध्ये कमिन्सने 60 ते 75 कोटी रुपये कमावले, यापैकी 18 कोटी रुपये केवळ सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या आयपीएल करारातून मिळाले.

Comments are closed.