पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; टी-20 वर्ल्डकपच्या तोंडावर बाबर आझम संघातून डच्चू, पाहा संपूर्ण Sq
पाकिस्तान संघ विरुद्ध श्रीलंका T20 मालिका : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरणार आहे. या संघात पाकिस्तानसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू शादाब खान याची दमदार पुनरागमन झाली आहे, तर खराब फॉर्ममुळे स्टार फलंदाज बाबर आझमला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
शादाब खानची दमदार कमबॅक
27 वर्षीय शादाब खान याने यंदा जूनमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. नॅशनल क्रिकेट अकादमीत यशस्वी पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर तो सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (BBL) खेळत आहे. त्याच्या पुनरागमनामुळे पाकिस्तानी संघाच्या फिरकी आक्रमणाला मोठी ताकद मिळणार आहे.
बाबर आझम बाहेर, नव्या चेहऱ्यांना संधी
बाबर आझमला अलीकडेच पुन्हा टी20 संघात स्थान देण्यात आले होते. त्याने ट्राय-सिरीजमध्ये सहभाग घेत काही चांगल्या खेळीही केल्या, मात्र सातत्याचा अभाव आणि टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. दरम्यान, अनुभवी मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी आणि हारिस रऊफ हे सध्या बिग बॅश लीगमध्ये व्यस्त असल्याने तेही या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत.
ख्वाजा नाफेला पहिली संधी
स्टार खेळाडू अनुपस्थित असल्यामुळे निवड समितीने ख्वाजा नाफे या नवोदित खेळाडूला पहिल्यांदाच पाकिस्तानी टी20 संघात स्थान दिले आहे. ख्वाजा नाफेने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तो पाकिस्तान ‘अ’ संघाकडून खेळला असून आतापर्यंत 32 टी-20 सामन्यांत 132.81 च्या स्ट्राइक रेटने 688 धावा केल्या आहेत. तसेच तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळतो.
मालिकेचे वेळापत्रक
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना 7 जानेवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना 9 जानेवारीला, तर तिसरा आणि अंतिम सामना 11 जानेवारीला खेळवला जाईल. हे तिन्ही सामने दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या दृष्टीने महत्त्वाची मालिका
ही टी20 मालिका पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपसाठी आपला अंतिम संघ ठरवण्याची ही शेवटची संधी असेल. विशेष म्हणजे, पाकिस्तान आपले सर्व सामने कोलंबो (श्रीलंका) येथे खेळणार आहे.
पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ :
सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक), उस्मान तारिक.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.